Akshaya Tritiya Wishes in Marathi (अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!):आज अक्षय तृतीया का त्योहार मनाया जा रहा है। इस दिन को अबूझ मुहूर्त के रूप में जाना जाता है. इसलिए आज के दिन कोई भी शुभ काम आप बिना मुहूर्त देखे कर सकते हैं। यह त्योहार वैशाख महीने के शुक्ल पक्ष की तृतीया तिथि को मनाया जाता है। इस बार यह त्योहार आज यानी 30 अप्रैल को मनाया जा रहा है। इस दिन भगवान विष्णु और माता लक्ष्मी की विशेष पूजा की जाती है। धार्मिक मान्यताओं के मुताबिक, इस दिन सोना खरीदना भी शुभ माना जाता है। इस त्योहार की धूम तमिलनाडु, कर्नाटक, आंध्र प्रदेश और तेलंगाना में खूब देखने को मिलती है। इस खास मौके पर लोग अपने करीबियों को अलग अलग भाषाओं में शुभकामनाएं भी देते हैं। ऐसे में अगर आप अपने किसी मराठी दोस्तों, रिश्तेदारों और करीबियों को शुभकामनाएं देना चाहते हैं तो ये विशेज, मैसेज, कोट्स भेज सकते हैं।
1. तुमचे प्रत्येक काम असावे परिपूर्ण,
न काही राहो अपूर्ण,
दुःख, दारिद्र्याचा करूनी नाश
घरात होवो देवी लक्ष्मीचे आगमन!
2. क्षय व्हावी दरिद्रता अन्
दूर व्हावे दुःख तुमचे,
अक्षय्य तृतीयेच्या मंगल दिनापासूनी
ऐश्वर्य, धन-संपत्तीसह सुदृढ राहावे आरोग्य तुमचे!
3. घन न घन जसा बरसतो ढग,
धो धो जसा कोसळतो पाऊस
चारही दिशेत संचारते ऊर्जा!
तशीच होवो आपल्या दारी धनाची वर्षा,
मंगलमय होवो अक्षय्य तृतीयेचा पावन सण!
4. घरात तुमच्या देवी लक्ष्मीचा वास असो,
प्रत्येक विचारामध्ये देवी सरस्वतीची साथ असो,
संरक्षण करण्यास आसपास देवी दुर्गेचा वास असो,
तसाच आई-वडिलांचा आशीर्वाद असो,
त्यांच्याच पुण्याईने जीवन जाई उजळूनी,
येई सुख, समृद्धी अन् लाभ जीवनी,
बंधुभाव वाढे जनगणमनी…
शुभेच्छा आपणास अक्षय्य तृतीयेच्या पावन दिनी…!
5. अक्षय राहो सुख तुमचे…
अक्षय राहो धन तुमचे…
अक्षय राहो प्रेम तुमचे…
अक्षय राहो आरोग्य तुमचे…
असो तुमची कीर्ती अपरंपार..
होवो तुमचा सदा जयजयकार…
होवो तुमचा सदा जयजयकार…
अक्षय्य तृतीया दिनाच्या आपणास मंगलमय शुभेच्छा..!
6. नुसतीच नाही सोने-चांदीची खरेदी
दानाचंही आहे महत्त्व या दिवशी
हा सण आहे भरभराटीचा…
हा सण आहे दानधर्माचा..
अक्षय्य पुण्याची प्राप्ती करून देणारा सण!
सर्वांना मिळो मनाचे बळ…
सर्वांना मिळो अक्षय फळ…
अक्षय्य तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
7. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने लक्ष्मीच्या
कृपेसोबतच
तुमच्यावर आप्तजनांच्या प्रेमाचाही
वर्षाव होवो…
अक्षय्य तृतीयेच्या या शुभ दिवशी
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!!
8. अक्षय्य होवो मानवता
मत्सर होऊ दे क्षय
प्रेमाचा होऊ दे वर्षाव अन्
द्वेष करणारे जावेत पळून
अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा!!
9.“जीवनदीप जाई उजळुनी,
सुख, समृद्धी लाभो जीवनी,
भक्ती-प्रेमरस ओथंबुनी,
बंधुभाव वाढे जनगणमनी,
अक्षय्य तृतीयेच्या अक्षय्य शुभेच्छा…”
10. दारी तुमच्या सोनपावलांनी व्हावे लक्ष्मीचे आगमन
चारही दिशा जाव्या उजळून,
अलक्ष्मीचा नाश होऊन
सुख-समृद्धी, संपत्ती वाहू दे भरभरून!
अक्षय्य तृतीयेच्या चैतन्यमय अक्षय्य शुभेच्छा…
latest lifestyle stories