Happy Makar sankranti 2024 wishes in Marathi: मकर संक्रांति की धूम चारों तरफ देखने को मिल रही है। यह त्योहार भारतवर्ष में बड़े ही धूम धाम के साथ मनाया जाता है। हिंदू धर्म में इस पर्व का बेहद खास महत्व है। देश के साथ ही इसे नेपाल में भी बड़े धूम धाम के साथ मनाया जाता है। कई जगहों पर तो लोग पतंग भी उड़ाते हैं। सूर्य देव की पूजा-आराधना की जाती है। खुशियों के इस त्योहार में लोग एक-दूसरे को अलग-अलग भाषाओं में बधाईयां भी देते हैं। ऐसे में अगर अपने किसी खास को मराठी में संक्रांति की बधाई देना चाहते हैं तो ये शुभेच्छा संदेश भेज सकते हैं। यहां देखें मकर संक्रांति के मराठी शुभेच्छा संदेश, मैसेज, कोट्स, शायरी।
Happy Makar sankranti 2024 wishes in Marathi
कणभर तिळ मनभर प्रेम
गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा।
गोडवा घेऊन येतो जो सण
निमित्ताने त्या एकत्र येतात
सर्व जण …
अन् जुळून राहतात एकमेकांचे
मन…
अशा सुंदर सणाच्या खूप खूप शुभेच्छा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
अलगद जपुयात
नाते आपले
घट्ट करूयात
बंध आपले
सणाच्या निमित्ताने
वाढवू गोडवे
आपल्या नात्यातले
मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा…
प्रेम आहे ढीगभर
छोट्याशा तिळात
गोडवा आहे मणभर
गोड गुळात
राहो निरंतर
आपुलकी आपल्यात
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…
नात्यात मधुरता आणेल
लाडू तिळगुळाचा
साजरा करुया
साज या सणाचा
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…
नेसून येईल काळी साडी
दागिने असेल हलव्याचे
सुगडाची रास घेऊन
नाते दृढ करुया विश्वासाचे
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…
गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,
स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,
तिळावर फुलेल पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा..!
