अक्षय तृतीया शुभेच्छा, Akshaya Tritiya Hardik Shubhechha 2026 (अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा): अक्षय तृतीया का त्योहार हिंदू संस्कृति में बहुत शुभ माना जाता है। मान्यता है कि इस दिन किया गया कोई भी अच्छा काम कभी खत्म नहीं होता, यानी उसका फल अक्षय रहता है। लोग इस दिन पूजा-पाठ, दान और नई चीज़ों की शुरुआत करते हैं। घर में खुशियों का माहौल होता है। कहीं सोना खरीदा जाता है, तो कहीं मीठे पकवान बनाए जाते हैं। यही वजह है कि रसोई में भी खास हलचल रहती है और परिवार के साथ समय बिताने का मौका मिलता है। इस खास दिन पर लोग एक दूसरे को बधाई संदेश भी भेजते हैं। अगर आप भी किसी अपने को मराठी में अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा बोलना चाहते हैं तो यहां से अक्षय तृतीया स्पेशल शुभकामना संदेश, बधाई कोट्स, शायरी और मैसेज मराठी में देख सकते हैं।
Happy Akshaya Tritiya Wishes In Marathi -
1) अक्षय राहो सुख तुमचे…
अक्षय राहो धन तुमचे…
अक्षय राहो प्रेम तुमचे…
अक्षय राहो आरोग्य तुमचे…
असो तुमची कीर्ती अपरंपार..
होवो तुमचा सदा जयजयकार…
होवो तुमचा सदा जयजयकार…
अक्षय्य तृतीया दिनाच्या आपणास मंगलमय शुभेच्छा..!
2) तुमचे प्रत्येक काम असावे परिपूर्ण,
न काही राहो अपूर्ण,
दुःख, दारिद्र्याचा करूनी नाश
घरात होवो देवी लक्ष्मीचे आगमन!
3) घन न घन जसा बरसतो ढग,
धो धो जसा कोसळतो पाऊस
चारही दिशेत संचारते ऊर्जा!
तशीच होवो आपल्या दारी धनाची वर्षा,
मंगलमय होवो अक्षय्य तृतीयेचा पावन सण!
Akshaya Tritiya Marathi Quotes-
4) अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने लक्ष्मीच्या
कृपेसोबतच
तुमच्यावर आप्तजनांच्या प्रेमाचाही
वर्षाव होवो…
अक्षय्य तृतीयेच्या या शुभ दिवशी
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!!
5) दारी तुमच्या सोनपावलांनी व्हावे लक्ष्मीचे आगमन
चारही दिशा जाव्या उजळून,
अलक्ष्मीचा नाश होऊन
सुख-समृद्धी, संपत्ती वाहू दे भरभरून!
अक्षय्य तृतीयेच्या चैतन्यमय अक्षय्य शुभेच्छा…
6) क्षय व्हावी दरिद्रता अन्
दूर व्हावे दुःख तुमचे,
अक्षय्य तृतीयेच्या मंगल दिनापासूनी
ऐश्वर्य, धन-संपत्तीसह सुदृढ राहावे आरोग्य तुमचे!
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!!
7) घरात तुमच्या देवी लक्ष्मीचा वास असो,
प्रत्येक विचारामध्ये देवी सरस्वतीची साथ असो,
संरक्षण करण्यास आसपास देवी दुर्गेचा वास असो,
तसाच आई-वडिलांचा आशीर्वाद असो,
त्यांच्याच पुण्याईने जीवन जाई उजळूनी,
येई सुख, समृद्धी अन् लाभ जीवनी,
बंधुभाव वाढे जनगणमनी…
शुभेच्छा आपणास अक्षय्य तृतीयेच्या पावन दिनी…!
Akshaya Tritiya Wishes Messages In Marathi-
8) जीवनदीप जाई उजळुनी,
सुख, समृद्धी लाभो जीवनी,
भक्ती-प्रेमरस ओथंबुनी,
बंधुभाव वाढे जनगणमनी,
अक्षय्य तृतीयेच्या अक्षय्य शुभेच्छा…
9) नुसतीच नाही सोने-चांदीची खरेदी
दानाचंही आहे महत्त्व या दिवशी
हा सण आहे भरभराटीचा…
हा सण आहे दानधर्माचा..
अक्षय्य पुण्याची प्राप्ती करून देणारा सण!
सर्वांना मिळो मनाचे बळ…
सर्वांना मिळो अक्षय फळ…
अक्षय्य तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
10) अक्षय्य होवो मानवता
मत्सर होऊ दे क्षय
प्रेमाचा होऊ दे वर्षाव अन्
द्वेष करणारे जावेत पळून
अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा!!
